वाढदिवसाच्या औचित्याने मा.आ. सुदर्शन निमकर मित्र परिवाराचा आगळावेगळा उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०४ सप्टेंबर २०२५) -
राजुरा विधानसभा क्षेत्रात तडफदार नेतृत्व करणारे माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता देशपांडे वाडी येथील जिम्नॅशियम सभागृह, राजुरा येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राष्ट्रीय मागासवर्ग आयोग दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर भूषविणार आहेत. यावेळी शुभाशिर्वाद देण्यासाठी शिक्षक आमदार नागपूर विभाग सुधाकरराव अडबाले, माजी आमदार अँड. संजयजी धोटे प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष रवींद्रजी शिंदे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष केशवराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा -
- सकाळी ८ वाजता श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळ येथे गावकऱ्यांच्या वतीने महाआरती
- सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत भवन ते भोसलाबाबा परिसर चुनाळ येथे वृक्षारोपण
- सकाळी ९.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे.
- सकाळी ११.३० वाजता देशपांडे वाडी येथील जीम्नेशियम हॉल मध्ये विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, उद्योजक तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचा सत्कार सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राजुरा तालुक्यातील भारत स्वाभिमान ट्रस्ट, पतंजलि योग्य परिवाराचे साधक श्री दत्तात्रय नामदेवराव मोरे व पतंजलि योग परिवाराची योग्य साधिका सौ. सुनीताताई अरुणराव जमदाडे यांना उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात येणार आहे.
नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती मा.आ. सुदर्शन निमकर मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
धर्म, आरोग्य आणि विकासाचा संगम – निमकरांचे कार्य आजही घडवते नवा आदर्श
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सामाजिक, धार्मिक व विकासात्मक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज राजुरा तालुक्यातील अनेक उपक्रमांना गती मिळाली असून नागरिकांना थेट फायदा होत आहे.
सर्वात मोठा ठसा उमटवणारे काम म्हणजे तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा येथे त्यांनी केलेले योगदान. या मंदिराच्या निर्मितीत सुदर्शन निमकर यांचा मोलाचा वाटा आहे. मंदिराचे आजचे वैभव व दरवर्षी साजरा होणारा ब्रम्होत्सव सोहळा हे त्यांचे दुरदृष्टीचे फळ मानले जाते. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. “मंदिराच्या माध्यमातून लोकांना आरोग्य लाभावा” हीच त्यामागची निमकरांची प्रेरणा आहे.
फक्त धार्मिकच नव्हे तर विकासात्मक कामेही त्यांनी सातत्याने रेटून धरली. राजुरा विधानसभा क्षेत्रात आमदार असताना त्यांनी अनेक महत्त्वाची कामे खेचून आणली. आज आपण पाहत असलेले गोविंदपूर ते राजुरा, बामणी ते लक्कडकोट पर्यंतचे रखडलेले हायवेचे काम त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच पूर्णत्वास येत आहे. पंचायत समिती ते रामपूर टी-पॉईंट तसेच बामणी टी-पॉईंट ते शिवाजी कॉलेज या मार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर, लाईट व रस्त्याच्या कडेला गट्टू (काँक्रीट बंधारे) हे सर्व निमकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाले. या मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनापुढे वारंवार भूमिका मांडून त्या प्रत्यक्षात आणल्या.
स्थानिक नागरिक सांगतात की, “सुदर्शन निमकर हे फक्त राजकारणी नसून दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक आणि विकासकामांचा संगम त्यांच्या कार्यकाळात दिसून आला”.
#RajuraEvent #SudarshanNimkar #AwardCeremony #RajuraNews #Leadership #SocialHonour #ChandrapurUpdates #tirupatibalajimandirchunala #brahmotsav #ExMLA #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.