काँग्रेसकडून गोल पुलिया रस्ता तातडीने सुरळीत करण्याची मागणी
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ३० ऑगस्ट २०२५) -
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली गोल पुलिया मार्गावरील रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गोल पुलिया विस्तारीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. मात्र या कामामुळे गोल पुलियामधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे विभागाकडून कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ वाढली असून, रेल्वे विभागाकडून पुलियाच्या एका बाजूने बांधकामाच्या नावाखाली अर्धा रस्ता अडवून ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे विभाग, महसूल विभाग तसेच पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निवेदन सादर करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, आनंद कटारे, नरसिंह रेब्बावर, लखपती घुगलोट यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#BallarpurNews #CongressDemand #GolPuliyaIssue #RoadWoes #PublicSafety #ChandrapurUpdates #CivicProblems #devendraarya #ghanshyammulchandani #chayamadavi #bhaskarmakode #ballarpurrailway #ballarpurpolice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.