Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विजेची तार चोरी प्रकरणी ७ आरोपी अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विजेची तार चोरी प्रकरणी ७ आरोपी अटक २४ तासांत पोलिसांचे यश – ६ लाखांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा भिसी (दि. २८ ऑगस्ट २०२५) -   ...
विजेची तार चोरी प्रकरणी ७ आरोपी अटक
२४ तासांत पोलिसांचे यश – ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भिसी (दि. २८ ऑगस्ट २०२५) -
        भिसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केवळ २४ तासांत विजेच्या तारा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल सात आरोपींना अटक केली असून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

        दि. २७ ऑगस्ट रोजी फिर्यादी नितेश कोंडुजी गव्हारे, सुपरवायझर, समिक्षा अँड डिम्पल इलेक्ट्रिकल कंपनी, चामोशी, जि. गडचिरोली यांनी भिसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती की, जांभुळघाट ते खापरी दरम्यानच्या १७ पोलवरून विजेची ॲल्युमिनियम तार किंमत १ लक्ष रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या फिर्यादीवरून अपराध क्र. ३०३ (२) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

        मुखबिरांच्या माहितीवरून पोलीसांनी कारवाई करत आनंद गुलाब नेवारे (वय २१ वर्ष), मंगेश निलकंठ बारेकर (वय २४ वर्ष), दोन्ही रा. जांभुळघाट यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीत कृष्णा रमेश मिटपल्लीवार (वय २३ वर्ष, रा. जांभुळघाट) याने मदत केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या तारा विक्रीसाठी रोशन अन्नाजी हजारे (वय २२ वर्ष) आणि कुणाल गणेश हजारे (वय १९ वर्ष) यांच्याकडे दिल्याचे उघड झाले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी तार विकत घेतल्याची कबुली दिली. यानंतर चोरीचा माल लपविण्यासाठी सागर अन्नाजी हजारे (वय २६ वर्ष) आणि विजय नंदकिशोर भेंडवाल (वय २१ वर्ष) यांची मदत घेतली. चोरीचा माल इंट्रा कंपनीची चारचाकी गाडी (क्र. MH 34 BG 9497) मध्ये भरून जांभुळघाट–खापरी मार्गावरील जंगलात झुडपात लपवण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपीतांकडून 
  • विजेची ॲल्युमिनियम तार – किंमत १ लाख रुपये
  • इंट्रा कंपनीची चारचाकी गाडी – किंमत ५ लाख रुपये
  • एकूण जप्त मुद्देमाल – ६ लाख रुपये असा ऐवज जप्त केला. 

        ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत प्रभारी ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा अजय बगडे, पोअं सतिश झिलपे, पोअं श्रीकांत वाढई, पोअं रेखलाल पटले, पोअं वैभव गोहणे आदींचा समावेश होता.

#BhiSiPolice #MajorBreakthrough #PowerTheftCase #StolenCablesRecovered #6LakhSeizure #SwiftAction #CrimeBusted #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top