Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती सदस्यांचा कढोली-देवाडा आरोग्य केंद्रांना दौरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नियुक्तीनंतर तत्काळ ॲक्शन; सागर भटपलीवार, भूपेश मेश्राम यांची पाहणी आमचा विदर्भ (वृत्तसेवा) राजुरा (दि. ०९ जुलै २०२६) -         राजुरा तालुक...
नियुक्तीनंतर तत्काळ ॲक्शन; सागर भटपलीवार, भूपेश मेश्राम यांची पाहणी
आमचा विदर्भ (वृत्तसेवा)
राजुरा (दि. ०९ जुलै २०२६) -
        राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे नवनियुक्त सदस्य सागर भटपलीवार आणि भूपेश मेश्राम यांनी नियुक्तीनंतर तत्काळ कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी (९ जुलै) कढोली व देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत त्यांनी आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय सुविधा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, औषधसाठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच कढोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सास्ती परिसरातील तीनही उपकेंद्रांच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, आवश्यक मनुष्यबळ, मूलभूत सुविधा तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

        नागरिकांना दर्जेदार, प्रभावी आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्रांतील समस्या प्रत्यक्ष पाहून त्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी भूमिका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे सदस्य सागर भटपलीवार आणि भूपेश मेश्राम यांनी व्यक्त केली. या भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेरणा तोंडकुलवार (कढोली), वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती बेले (देवाडा) तसेच दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी आरोग्य केंद्रांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देत विविध अडचणी सदस्यांसमोर मांडल्या.

        नियुक्तीनंतर तातडीने प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतल्यामुळे समिती सदस्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी अशा नियमित पाहणी दौऱ्यांची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

#RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #HealthDepartment #PrimaryHealthCentre #PHC #RuralHealthcare #SagarBhatpaliwar #BhupeshMeshram #DevraoBhongale #MaharashtraNews #VidarbhaNews #PublicHealth #AamchaVidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top