ज्ञानदानातून घडलेल्या जीवनप्रवासाची कहाणी पुस्तकबद्ध
राजुरात प्रकाशन सोहळा; अनेक मान्यवरांची उपस्थिती
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. १३ जुलै २०२६) -
आयुष्यभर ज्ञानदान, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरणारे सेवानिवृत्त प्रा. डॉ. संतोष देठे यांच्या 'माझं जगणं माझा अर्थ' या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा १२ जुलै रोजी राजुरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. संजय गोरे यांनी आत्मकथनाविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, 'माझं जगणं माझा अर्थ' हे केवळ एका व्यक्तीचे आत्मकथन नसून संघर्ष, जिद्द, कष्ट, माणुसकी आणि जीवनमूल्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. आयुष्यात संकटांना सामोरे जाणाऱ्या आणि खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला या आत्मकथनातून नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. संजय धोटे होते. उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा सहसचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ दौलतराव भोंगळे, सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अविनाश जाधव, प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा डॉ.पी.यू. बोंडे, महात्मा फुले महाविद्यालय आष्टीचे डॉ. राजकुमार मुसने तसेच उपप्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा डॉ. राजेश खेरानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी देठे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रकाशकांच्या वतीने लेखक प्रा. डॉ. संतोष देठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. शरद बेलोरकर, डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. सुयोग साळवे आणि अविनाश दोरखंडे यांनीही उपस्थित राहून आत्मकथनाच्या साहित्यिक, सामाजिक आणि प्रेरणादायी पैलूंवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राजुरा शहरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, साहित्यप्रेमी, गणमान्य नागरिक, नातेवाईक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे आयोजन सौरभ मिश्रा, मृणाल मिश्रा-देठे आणि कु. प्रांजल देठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रांजल देठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश गेडाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौरभ मिश्रा यांनी मानले. स्नेहभोजनाने प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.
#SantoshDethe #sanjaygore #advsanjaydhote #suyogsalve #daulatraobhongale #avinashdorkhande #Sharad Belorkar #HemchandDudhgwali #avinashjadhav #NitinChincholkar #MajhaJaganMajhaArth #BookLaunch #Autobiography #Rajura #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #MarathiLiterature #MarathiBook #BookRelease #DrSanjayGore #Education #InspirationalStory #VidarbhaNews #MaharashtraNews #LiteraryEvent #MotivationalBook #AamchaVidarbha #LocalNews

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.