आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २१ जानेवारी २०२६) -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सास्ती यांच्या वतीने तसेच संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, चंद्रपूर यांच्या सहकार्याने सास्ती येथे मोफत आरोग्य शिबिर व रक्त तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात रामपूर ग्रामपंचायतच्या सरपंच निकिता रमेश झाडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी, आरोग्य सल्ला व प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. आरोग्याविषयी जनजागृती करणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या शिबिराचा जवळपास १२२ लोकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजुरा तालुकाप्रमुख रमेश झाडे, उपतालुकाप्रमुख व सास्ती गावचे माजी सरपंच रमेश पेटकर, राजुरा विधानसभा युवासेना उपजिल्हाप्रमुख व सास्ती गावचे माजी उपसरपंच कुणाल कुडे, राजुरा युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, माजी सदस्य मुरारी बुगारप, शाखाप्रमुख संतोष कुडे उपस्थित होते. याशिवाय शिवसैनिक विलास भटारकर, रवि दुवासी, अंकुश पवनकर, बालाजी रचावार, गणेश चन्ने, शंकर पेटकर, बबलू पठाण, प्रकाश ढेंगरे, अशोक पेटकर, धर्मराज नगराळे, विनोद पेटकर, कमलाकर तिखट, अल्ताफ शेख, सचिन पेटकर, बंडू गिरसावले, प्रभाकर कोरते, योगेश पेटकर, जय पेटकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता युवासेना तालुका चिटणीस राजुरा प्रविण पेटकर, रोहित पवनकर, अंकुश बुटले, साबीर पठाण, कृष्णा पवनकर, हर्षल पेटकर, आतिश पवनकर, साहिल तिखट, रोशन पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. आरोग्य हीच खरी संपत्ती असून अशा मोफत आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा लाभ होत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
#HealthCamp #FreeMedicalCamp #BloodTest #PublicHealth #SocialResponsibility #ShivSena #CommunityHealth #ShivSenaUddhavBalasahebThackeray #sasti #sankalpbahuuudeshiyagramvikassanstha #Sarpanch #Rampur #NikitaRameshZade #NikitaZade #RameshZade #KunalKude #BuntyMalekar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.