मोबाईल वापर व तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २१ जानेवारी २०२६) -
महाराणी अहिल्याबाई होळकर धनगर समाज प्रबोधन महिला मंच राजुरा यांच्या वतीने संत नगाजी महाराज सभागृहात हळदीकुंकू व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण, समाजप्रबोधन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुधाताई चिडे होत्या. प्रमुख पाहुण्या सुरेखा उराडे, ताई बाई खाडे, मुख्याध्यापिका इंदिरा येवले, पुष्पा उराडे, छाया बुरांडे, ज्योत्स्ना ठमके, अर्चना महात्मे, राधा केराडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका इंदिरा येवले यांनी स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता शिक्षण, समाजकार्य आणि विविध क्षेत्रांत सक्षमपणे पुढे आले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्या सुरेखा उराडे यांनी समाजातील महिलांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक असून तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा अतिवापर टाळून सकारात्मक वापर कसा करता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या ढवळे यांनी केले. शिक्षणाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी करावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उंच शिखरावर नेण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सुधाताई चिडे यांनी जुन्या काळातील आणि सध्याच्या काळातील परिस्थितीची तुलना करत धनगर समाजातील महिलांनी शिक्षण, समाजकार्य, स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रांत कुठेही मागे राहू नये, असे ठाम आवाहन केले.
हळदीकुंकू कार्यक्रमांतर्गत महिला नृत्य स्पर्धा, वन मिनिट शो स्पर्धा तसेच मुलांच्या नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांतील विजयी संघ व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला.
स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन सुनीता डवरे व मनीषा धवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संध्या ढवळे, द्रोपदी पोतले, निता उराडे, प्रणाली तुराडे, मनीषा धवणे, सुनीता डावरे, प्रतिमा बुरांडे, संध्या गोखरे, सोनल चिडे, इंदिरा येवले, ताई बाई खाडे, उर्मिला चिडे, मोहिनी खरबडे, अर्चना महात्मे, शिला पेंटे, पौर्णिमा चीवने यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन वनश्री चिडे यांनी केले. आभार प्रदर्शन मनीषा धवणे यांनी मानले. कार्यक्रमात महिलांचा व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
#AhilyabaiHolkar #DhangarSamaj #WomenEmpowerment #StudentFelicitations #SocialAwareness #CommunityEvent #Rajura #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.