बल्लारपूर (दि. २१ जानेवारी २०२६) -
बल्लारपूर नगरपरिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक विशेष सभेत शांततेत व एकमताने पार पडली. बल्लारपूर नगरपरिषदेची विशेष बैठक दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी भूषविले. या विशेष बैठकीत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापति तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांची स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या पदसिद्ध सभापतिपदी एकमताने निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी अब्दुल करीम शेख, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी इस्माईल ढाकवाला, विकास व नियोजन समितीच्या सभापतिपदी पवन मेश्राम, शिक्षण समितीच्या सभापतिपदी प्रियंका थुलकर आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी मेघा भाले यांची नियुक्ती करण्यात आली. याच बैठकीत स्थायी समिती सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष छाया मडावी, लखनसिंह चंदेल आणि करुणा नरसिंह रेब्बावर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नगराध्यक्ष अलका अनिल वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच विशेष सभेला उपस्थित सर्व नगरपरिषद सदस्यांनी नवनिर्वाचित सभापति व स्थायी समिती सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
उपनगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला
तत्पूर्वी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ आणि नगराध्यक्ष अलका अनिल वाढई उपस्थित होते. पदभार स्वीकारताना उपस्थित सर्व नगरपरिषद सदस्य, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
#BallarpurMunicipalCouncil #MunicipalElection #CommitteeChairman #LocalGovernance #UrbanAdministration #BallarpurNews #CivicBody #upnagaradhyksha #DeputyMayor #DevendraArya #AbdulKarimShaikh #IsmailDhakwala #PawanMeshram #PriyankaThulkar #MeghaBhale #ChhayaMadavi #LakhanSinghChandel #KarunaNarsinghRebbawar #Mayor #AlkaAnilVadhai #ChiefOfficer #VishalWagh #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.