आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २१ जानेवारी २०२६) -
दगडोजीराव देशमुख विद्यालय कढोली (खु) येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन उत्साहात साजरे करण्यात आले. आदर्श ग्राम विकास सेवा मंडळ द्वारा संचालित या विद्यालयातील सन २००९–२०१० सत्रातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल १६ वर्षांनंतर परिवारासह एकत्र आले. शालेय मैदानात आयोजित या स्नेह मिलन कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी परस्परांशी संवाद साधत आपापल्या शैक्षणिक प्रवासाची, सामाजिक वाटचालीची व व्यावसायिक प्रगतीची माहिती दिली. शासकीय सेवेत, विविध व्यवसायांत व खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले.
शाळेत शिक्षण घेत असताना आलेले अनुभव, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त, मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण तसेच सध्याची सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती यावर खुल्या मनाने चर्चा करण्यात आली. या संवादातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर नव्या पिढीसाठी प्रेरणादायी विचारही मांडले गेले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक प्रकाश राऊत, शिक्षिका बिलोरिया मॅडम, शिक्षिका सायरे माहुरे यांनी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी बंडु वडस्कर, माजी विद्यार्थी गणेश दहीवलकर, माजी विद्यार्थी दयाल बोढे, माजी विद्यार्थी दिनेश क्षीरसागर, माजी विद्यार्थी निखिल बोंडे, माजी विद्यार्थिनी अंकितावसु, माजी विद्यार्थिनी रूपाली चंदनकर, माजी विद्यार्थिनी पपिता दरेकर, माजी विद्यार्थिनी भाग्यश्री इटनकर, माजी विद्यार्थिनी संगीता कुडसंगे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला शाळेचे कर्मचारी नारायण अवताडे, मडावी, बाळा दरेकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष आबिद अली यांनी कार्यक्रमाला भेट देत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन उपक्रमाचे कौतुक केले. जुने मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे, समाजासाठी प्रेरणादायी ठरणे ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्नेह भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची आनंदी वातावरणात सांगता करण्यात आली.
#AlumniMeet #SchoolReunion #EducationMatters #StudentLife #MarathiNews #EducationalEvent #AlumniBond #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.