आमचा विदर्भ ब्रह्मपुरी (दि. १२ नोव्हेंबर २०२५) -
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधण्याचा एक उल्लेखनीय उपक्रम राबवला असून, नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा पोलीस दलावर दृढ केला आहे. CEIR Portal (Central Equipment Identity Register) आणि सायबर ट्रॅकिंगच्या माध्यमातून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरीच्या हद्दीत हरवलेले २४ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले आहेत.
या यशस्वी उपक्रमात डीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अमलदार निलेश तुमसरे, पोलीस अमलदार स्वप्निल पळसपगार, पोलीस अमलदार चंदू कुरसंगे, पोलीस अमलदार इरशाद खान आणि वशिष्ठ रंगारी यांनी अथक प्रयत्न करून हा शोधमोहीम यशस्वी केली.
सदर सर्व मोबाईलचा शोध पूर्ण झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद बानवले यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ धारकांना परत देण्यात आले. यावेळी मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नागरिकांनी पोलीस दलाचे मन:पूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांनी जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक प्रमोद बानवले यांनी यावेळी सांगितले की, “नागरिकांनी मोबाईल हरवल्यानंतर त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. सायबर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपासाद्वारे हरवलेले मोबाईल शोधून काढणे शक्य झाले आहे. पोलीस यंत्रणा नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे.” या कार्यवाहीमुळे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे कौतुक सर्वत्र होत असून, सायबर युगात पोलिसांनी दाखवलेले हे तांत्रिक कौशल्य कौतुकास्पद ठरत आहे. जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
#BrahmapuriPolice #MobileRecovery #CyberTracking #CEIRPortal #PramodBanawale #SmartPoliceWork #ChandrapurPolice #PublicService #DBTeamSuccess #PoliceDedication #CyberInvestigation #DigitalPolicing #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.