औद्योगिक क्षेत्रात मराठी कामगारांची ताकद पुन्हा वाढली
आमचा विदर्भ चंद्रपूर (दि. १२ नोव्हेंबर २०२५) -
औद्योगिक नगरी चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर शहरासह बल्लारपूर, पडोली, दुर्गापूर आणि ऊर्जानगर परिसरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचा भगवा झेंडा हातात घेत पक्षात प्रवेश केला.
या वेळी कार्यकर्त्यांनी “जय महाराष्ट्र”, “मराठी कामगारांचा विजय असो”, “मनसे जिंदाबाद” अशा घोषणा देत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मनसे कामगार सेनेत झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे.
जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक मराठी युवकांना रोजगारापासून वंचित ठेवून परप्रांतीयांना नोकऱ्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनाचा कायदा असूनही स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के रोजगार देण्याचा नियम फक्त कागदावरच राहिला आहे. हे अन्यायकारक वास्तव आता आम्ही मान्य करणार नाही. मराठी कामगारांसाठीचा लढा मनसेच पुढे नेणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसाच्या हक्कासाठी निडरपणे उभी आहे. त्यामुळे आज युवकांमध्ये मनसेबद्दल नवा विश्वास निर्माण झाला आहे आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत येत आहे.”
या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राजेश मडावी, प्रदीप जाधव, संदीप कोंडावार, गणेश वाकडे, निखिल मडावी, प्रेमसागर राजपूत, विकास हेडाऊ, अमोल पवार, रवी कांबळे, शरद साखरे, सचिन टाकळीकर, मयूर भोयर, सागर नागडे, राजेश घोटेकर, प्रकाश चव्हाण, अनिल बोंडे, संतोष गेडाम, नितीन टेम्बे, विनोद नेरकर, संतोष लोहकरे, अनिकेत गजभिये, मिलिंद नागरे, सागर इंगळे, गजानन देशमुख, विजय धोटे, दत्ता कडू यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमाचे आयोजन मनसे कामगार सेनेचे शहर प्रमुख निखिल खांडाते आणि तालुका प्रमुख अमोल बारसागडे यांनी केले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत औद्योगिक क्षेत्रातील मराठी युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचा झेंडा अधिकाधिक उंचावण्याचा संकल्प केला. या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मराठी कामगारांची संघटित चळवळ नव्या जोमानं उभी राहिल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आगामी काळात औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी मनसेतर्फे तीव्र आंदोलनाची चेतावणीही देण्यात आली आहे.
#MNSChandrapur #AmanAndhewar #MNSWorkersFront #RajThackeray #MarathiPride #MNSExpansion #ChandrapurPolitics #MarathiRights #MNSMovement #WorkersUnity #ChandrapurMNS #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.