सततच्या विजेच्या खंडिततेवर नागरिकांचा संताप, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी हैराण
आमचा विदर्भ राजुरा (दि. १२ नोव्हेंबर २०२५) -
राजुरा शहर आणि परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव आता असह्य पातळीवर पोहोचला आहे. वारा असो वा पाऊस, वा कोणताही बहाणा असो, पण वीजपुरवठा खंडित होणे हेच आता राजुराचे नित्याचे वास्तव झाले आहे. सततच्या या विजेच्या गायब खेळामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचा रोजचा दिनक्रम विस्कळीत झाला आहे.
राजुरा तालुका आणि शहरातील वीज पुरवठ्याची ही समस्या आता केवळ त्रासदायक नाही तर अर्थव्यवस्थेवर आणि विकास प्रक्रियेवर परिणाम करणारी बनली आहे. शासनाने सर्वत्र ऑनलाईन पद्धतीचा अवलंब सक्तीचा केला असतानाच, सततच्या विजेच्या खंडिततेमुळे नागरिकांचे शासकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक कामकाज ठप्प होते.
विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था, व्यापाऱ्यांचा व्यवसाय – सगळेच ठप्प!
वीज गेल्यावर वायफाय बंद पडतो, संगणक बंद पडतात, ऑनलाईन काम थांबतं, पाणीपुरवठा खंडित होतो आणि रात्री अंधारात नागरिकांना धोका निर्माण होतो. शेतकऱ्यांचे सिंचन पंप बंद पडतात, व्यापाऱ्यांचे दुकानांचे व्यवहार ठप्प होतात, तर रुग्णालयातील उपकरणांवर जीवाचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राजुरा कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. संघटनेने वीज उपकेंद्राचे आधुनिकीकरण करून क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे.
यावेळी संघटनेचे युवा शहर अध्यक्ष रोहित बत्ताशंकर तसेच सहकारी राजु लड्डा, श्रावण साळवे, अतुल सिंग, साहिल कायडिंगे, चेतन मेश्राम, बालाजी चौधरी, ऋतुज जुलमे आणि आर्यन दुबे उपस्थित होते. संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, लवकरच वीज पुरवठ्याचा स्थायी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल. राजुरातील नागरिक आता या “विजेच्या लपंडावाने” त्रस्त झाले असून, शेतकरी वर्गाच्या संयमाचा अंत जवळ आला आहे. “राजुरात प्रकाश केव्हा कायमचा येणार?” हा नागरिकांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
#RajuraPowerCrisis #ElectricityCut #SurajThakare #JaiBhawaniUnion #FarmersVoice #RajuraNews #ChandrapurUpdates #PowerOutage #PublicSuffering #WeNeedElectricity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.