नियमांचे उघड उल्लंघन; पोलिस कारवाई कुणाच्या मृत्यूची वाट बघतेय का?
आमचा विदर्भ -बल्लारपूर (दि. 15 नोव्हेंबर 2025) -
बल्लारपूर येथील पेपर मिल (बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड) समोरील मुख्य रस्त्यावर कंपनीच्या अवजड वाहनांनी नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे ताबा मिळवत वाहतूक कोंडी निर्माण केल्याने नागरिकांचे दैनंदिन हाल वाढले आहेत. बल्लारपूर–चंद्रपूर मुख्य महामार्गावरील या अनियमित पार्किंगमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
अवजड वाहनांची मनमानी; महामार्ग बनला धोक्याचा पट्टा
ट्रक, लॉरीसह इतर अवजड वाहनांनी मुख्य मार्गावर उल्लंघन करत उभे राहिल्याने रस्त्यावर सैलचालकीच्या घटना वाढल्या आहेत. पार्किंगसाठी कंपनीकडे जागा उपलब्ध असतानाही वाहनचालकांकडून नियमांचा उघड उघड भंग होत असून, प्रवाशांचा वेळ, जीवित आणि सुरक्षितता धोक्यात येत आहे.
संघटनेचा संताप; निवेदन सादर करून दिली कठोर चेतावणी
जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी 14 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित विभागाला निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली. सुरज ठाकरे यांनी स्पष्ट केले की कंपनीतील वाहनांनी शासकीय मार्गावर उभे राहण्याऐवजी कंपनीने दिलेल्या पार्किंगमध्येच राहणे बंधनकारक आहे आणि या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कार्यवाही करावी.
सदर निवेदन दिल्यानंतरही बल्लारपूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. स्थानिकांमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे की पोलीस प्रशासन कुणाच्या जीवाची आहुती झाल्यावरच जागे होणार का? निवेदन असूनही कारवाई न करण्यामागे पोलिस आणि कंपनी प्रशासनातील काही आर्थिक देवाणघेवाणीचे साठेबाज संबंध आहेत का, अशी शंका नागरिकांत बळावू लागली आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि पोलिसांचे मौन यामुळे परिस्थिती धोकादायक बनली आहे. स्थानिकांना आशा आहे की पोलिसांकडून कडक आणि तातडीची कारवाई झाल्यानंतरच या सर्व शंका दूर होतील आणि अवजड वाहनांची मनमानी थांबेल.
#BallarpurIssue #HighwayJam #TrafficChaos #PublicSafety #HeavyVehicles #AdministrationFailure #ChandrapurNews #VidarbhaUpdate #RoadSafety #PublicVoice #jaibhavanikamgarsanghtna #SurajThackeray #ballarpur #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

भाऊ अशीच ट्रॅफिक अंबुजा फाटा आणि गडचांदुर का पण राहते नेहमीच त्यामुळे महामार्ग वर एक्सिडेंट जास्त प्रमाणात होत आहे .या कडे कोणीच लक्ष देत नहीं आहे.
उत्तर द्याहटवा