आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १७ नोव्हेंबर २०२५) –
राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार आदित्य भाके यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत नगरसेवक पदाकरिता १० उमेदवारांनीही अर्ज दाखल करून निवडणुकीचे वातावरण तापविले आहे. यात प्रभाग क्रमांक १ करिता रुपेश धोटे, प्रभाग क्रमांक २ करिता अमोल सदाशिव राऊत, मिना देविदास डांगे, प्रभाग क्रमांक ३ करिता गजानन भटारकर, प्रभाग क्रमांक ५ करिता गजाला शेख, प्रभाग क्रमांक ६ करिता साधना विजय भाके, प्रभाग क्रमांक ७ करिता अजीज इस्माईल शेख, प्रभाग क्रमांक ८ करिता रतन रुमदेव काटोले आणि प्रभाग क्रमांक १० करिता मेघा अक्षय गंपावार यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जदाखल मुळे राजुरा शहरात व प्रभागात अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार आदित्य भाके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील जुने, निष्ठावान आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. २०१६ च्या निवडणुकीत त्यांच्या आई, माजी नगरसेविका साधना भाके यांनी २५ वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोमनाथपूर वार्डातून अपक्ष निवडणूक लढवून प्रचंड बहुमताने विजय मिळविला होता. साधना भाके यांनी महिला, बालकल्याण व आरोग्य सभापती म्हणून जबाबदारी सांभाळत आपल्या कार्यकाळात तब्बल ३५ लाख रुपये किमतीचा घनकचरा प्रकल्प मंजूर करून शहराच्या कचरा व्यवस्थापनाला चालना दिली होती. मात्र प्रशासक राज आल्यापासून या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
साधना भाके यांनी सोमनाथपूर वार्डात भरणाऱ्या साप्ताहिक बाजारासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याकरिता अतोनात प्रयत्न केले होते. प्राचीन सोमेश्वर मंदिराच्या नाका क्रमांक ३ जवळ आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या कामांमुळे वार्डातील नागरिकांच्या मूलभूत गरजांचा वेध घेतला गेल्याचे चित्र होते. परंतु, गेल्या २५ वर्षांत राजुरा शहराचा जेवढा सर्वांगीण विकास व्हायला हवा होता, तो कागदावरच रेंगाळला, अशी टीका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदित्य भाके यांनी केली. आपल्या समर्थनार्थ मोठी जनसमुदाय उपस्थित असताना त्यांनी सांगितले की, “मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास प्रत्यक्षात विकास म्हणजे काय हे राजूरावासीयांना दाखवून देईन. शहराचा कायाकल्प करणे हे माझे ध्येय आहे. याकरिता नागरिकांनी मला एक संधी द्यावी.”
आदित्य भाके यांनी शहरातील प्रमुख समस्या थेट मतदारांसमोर मांडल्या. भरमसाठ वाढलेले मालमत्ता कर, वारंवार खंडित होणारी वीज, असुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गटार व ड्रेनेज लाईनची जीर्ण अवस्था, पावसाळ्यात चाळण्यासारखे गळणारे रस्ते, वाढती अस्वच्छता, अंधारात बुडालेल्या वार्डातील विजेच्या खांबांची अनुपस्थिती, बेकायदा पार्किंगचा वाढता त्रास, शहरातील वाढता धूर–धूळ प्रदूषण अशा अनेक समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “राजुरा शहराला विकास हवा आहे, आश्वासनांची धूळफेक नको. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत राजुराचे आधुनिक शहरात रूपांतर करणार,” असे आदित्य भाके यांनी नमूद केले.
#RajuraElection2025 #AdityaBhake #NCPAjitPawarGroup #RajuraForChange #DevelopmentFirst #RajuraPolitics #NagarParishadElection #TeamBhake #VoteForProgress #RajuraUpdates #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.