आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. १० सप्टेंबर २०२५) -
बल्लारपूर पोलिसांनी एका कारवाईत लोखंडी तलवार बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सपोनि मदन दिवटे यांच्यासह पोलिस पथक पेट्रोलिंग करीत असताना, मुखबीरकडून माहिती मिळाली की संघमित्रा चौक, विद्यानगर वार्ड येथील समीर कुरेशी वय ४२ याने आपल्या घरी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना लोखंडी तलवार बाळगली आहे. यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत कुरेशीच्या घरावर छापा मारला. घराच्या सज्ज्यावर लपवून ठेवलेली लोखंडी तलवार पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे आरोपी समीर कुरेशी याच्यावर कलम ४, २५ आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव (राजूरा/चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि मदन दिवटे, सपौनि रणविजय ठाकुर, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, पुरुषोत्तम चिकाटे, पो.अंमलदार शरदचंद्र कारूष, लखन चव्हाण, विकास जुमनाके, सचिन अलेवार, म.पो.अंमलदार शालिनी नैताम यांचा समावेश होता. पथकाने ही कारवाई कुशलतेने पार पाडली.
#BallarpurPolice #IllegalWeaponSeized #PoliceRaid #CrimeUpdate #ChandrapurNews #BreakingNews #PoliceAction #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.