Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "लोकशाहीची गळचेपी थांबवा – जनसुरक्षा कायदा रद्द करा"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूरात महाविकास आघाडीचे जोरदार धरणे आंदोलन आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपूर (दि. १० सप्टेंबर २०२५) -       महाराष्ट्र राज्य सरकार लो...
बल्लारपूरात महाविकास आघाडीचे जोरदार धरणे आंदोलन
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. १० सप्टेंबर २०२५) -
      महाराष्ट्र राज्य सरकार लोकशाहीविरोधी जनसुरक्षा कायदा अंमलात आणण्याच्या तयारीत असून या कायद्याद्वारे लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आज मंगळवार (दि. १०) रोजी बल्लारपूर नगरपालिकेसमोर आयोजित धरणे आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यात आला.

        आंदोलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जनसुरक्षा कायदा म्हणजे दडपशाहीचे धोरण असून महाराष्ट्राच्या पुरोगामी ओळखीला धोका असल्याचे स्पष्ट केले. महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करत आंदोलनात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

        या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, रोशनलाल बिट्टू, शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख विनोद उर्फ सिक्की यादव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष बादल उराडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, काँग्रेस नेत्या डॉ. रजनी हजारे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, छाया मडावी, सुनंदा आत्राम, भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, अफसाना सय्यद, ॲड. मेघा भाले, डॉ. सुनील कुलदीवार, विकास आघाडीचे भारत थूलकर, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव चेतन गेडाम, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष शफाक शेख, ॲड. पवन मेश्राम, प्रकाश पाठक, बाबा साहू, कल्पना गोरघाटे, ज्योती गहलोत, मिनाक्षी गलगट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        धरना आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्राणेश अमराज, नरसिंह रेब्बावार, राकेश मुलचंदानी, सादिक जवेरी, रोजिदा ताजूद्दीन, नरेश आनंद, अरबाज सिद्धीकी, अंकीत निवलकर, एड. सय्यद, मंगेश बावणे, कासिम शेख, नाना बुंदेल, मेहमूद पठान, नाजुका आलाम, वासुदेव येरगुडे, प्रितम पाटील, सुरेश बोप्पनवार, वर्षा कडू, अंकू बाई भूक्या, रेखा रामटेके, छाया शेंडे, विथा बाई बावणे, शारदा आक्केवर, आकाशकांत दुर्गे, दुर्गेश मुत्यालवार, रक्षित कृष्णापेल्ली, ताहेर हुसेन, मोहसिन शराफत हुसैन, वाजिद खान, कृष्णा देशवाणी, रोनित गलगट, संदीप टांगें, लखपति घुग़लोत, राजू मारमवार, रमेश जक्कू, नंदू पाल, अमीर शेख, चंचल मुन, दुर्गाराज आरेकर, चंदू वाढ़ई, प्रफुल बोप्पनवार, शेख यूसुफ, सुधाकर पोपले, धर्मा बानोत, अंजलि सोमबंसी, सुनीता राजूरकर, पूजा मडावी, आनंद हनमंतु, बॉबी कादासी, मुकद्दर सय्यद, फारुख खान, जहिर अहमद, सादीक, सूर्यकांत साल्वे खान आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. आंदोलनातून जनसुरक्षा कायदा मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

#BallarpurProtest #MVAProtest #PublicSafetyAct #DemocracyUnderThreat #StopOppression #MaharashtraPolitics #VoiceOfPeople #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top