आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येणारा महसूल सेवा पंधरवडा उपक्रम ग्रामीण भागात प्रभावी ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) सुरू होणारा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) चालणारा हा उपक्रम नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सोडविण्यावर भर देतो. राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु) येथे दिनांक २४ सप्टेंबर रोजी महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत विशेष कार्यक्रम पार पडला. तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचाळा, मणगाव रिठ, सातरी, चणाखा, सिंधी, नलफळी या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामा केला आणि तातडीने मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना दिलेली मार्गदर्शन व सेवा
- पिकांचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करणे
- पांदण व शिवार रस्त्यांची नोंदणी, मोजणी व सीमांकन
- रस्त्यावरील वादांचे निराकरण
- सरकारी जागेवरील अतिक्रमण व पट्ट्यांबाबत मार्गदर्शन
- ई-पीक नोंदणी व फार्मर आयडी नोंदणीस मदत
- सार्वजनिक सुविधा अतिक्रमणमुक्त करण्याबाबत सूचना
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत व शासनाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती मिळाली. महसूल विभागाने थेट गावात येऊन समस्या ऐकल्या याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला तहसीलदार ओमप्रकाश गोंड, मंडळ अधिकारी विरुर सुभाष साळवे, तलाठी परेज मैदंवार, सरपंच पिलाजी भोंगळे, उपसरपंच पुष्पांजली धनवलकर, पोलीस पाटील संतोष नेवारे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर वाघमारे, वर्षा तावाडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व महिला नागरिक उपस्थित होते. महसूल सेवा पंधरवडा हा औपचारिक कार्यक्रम न ठरता, शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि शासनाशी थेट संवाद साधण्याचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी केले.
#RevenueServiceFortnight #FarmersRelief #RajuraNews #ChandrapurUpdates #VillageConnect #FarmerSupport #MaharashtraGovernance #dromprakashgond #subhashsalve #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.