Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वादळी वार्‍याने कटलेली सर्विस वायर ठरली मृत्यूचे कारण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेंडे यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -         नागभी...
सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेंडे यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
        नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथे दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत धर्मा शेंडे या व्यक्तीचा सौलर पंप सुरू करताना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पावसासह वादळी वारा वाहत होता. त्याचदरम्यान वादळामुळे शेंडे यांच्या घराला जोडलेली सर्विस वायर कट होऊन सौलर पॅनलवर आदळली. त्यामुळे सौलर पंपाच्या लोखंडी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास धर्मा शेंडे हे टाकीत पाणी भरण्यासाठी सौलर पंप सुरू करण्यास गेले. त्यांनी लोखंडी खांबाला हात लावताच जोरदार विद्युत धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

         गोविंदपूर येथील सार्वजनिक विहीरीवर बसविण्यात आलेल्या सौलर पंपाच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. शेंडे हे नियमितपणे हा पंप सुरू करीत असत. मात्र काल झालेल्या वादळामुळे झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडली. शेंडे यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. धर्मा शेंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या अचानक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

#ElectricShock #SolarPumpAccident #ChandrapurNews #Nagbhid #RuralSafety #TragicLoss #StaySafe #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top