Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गाईच्या हल्ल्यात महिला ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गाईच्या हल्ल्यात महिला ठार मदतीला गेलेल्यांवरही हल्ला – चार जण जखमी आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. २३ ऑगस्ट २०२५) -          शहराती...
गाईच्या हल्ल्यात महिला ठार
मदतीला गेलेल्यांवरही हल्ला – चार जण जखमी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २३ ऑगस्ट २०२५) - 
        शहरातील पडोली येथील इंदिरा नगर वार्ड क्रमांक 1 येथे भटक्या गाईच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आणखी चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव बेतीताई बबन भगत वय 52, रा. इंदिरा नगर असे आहे. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर महिलेवर गाईने हल्ला केल्याचे पाहून मदतीला धावून गेलेल्या कोमल अशोक कांबळे, सीमा चेतन अरुदाकर (वय 38), राकेश बवन मेश्राम आणि कैलास नामदेव धुडे (वय 54) यांच्यावरही गाईने हल्ला केला. त्यांना गंभीर जखमा झाल्या असून चंद्रपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील पहिली घटना
        चंद्रपूर जिल्ह्यात गाईच्या हल्ल्यात प्रथमच एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे व वातावरणात खळबळ निर्माण झाली आहे. प्यार फाउंडेशनच्या प्राथमिक अंदाजानुसार, सदर गाईला कुत्र्याने चावल्याने ती चवताळली होती. त्यामुळेच तिने महिलांवर व नागरिकांवर हल्ला केला असावा. सदर गाईला जेरबंद करण्यात आले असून मोकाट जनावरे सोडणाऱ्या गाईच्या मालकावर पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#NagpurIncident #StrayCattleAttack #ChandrapurNews #PublicSafety #AnimalAttack #PadoliIncident #BreakingNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top