Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रिजेक्ट कोल गेट–आवंठा डॅम रस्ता खड्डेमय, ग्रामस्थ त्रस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रिजेक्ट कोल गेट–आवंठा डॅम रस्ता खड्डेमय, ग्रामस्थ त्रस्त रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी, अन्यथा सीटीपीएस वाहतूक बंद शिवसेना महानगरप्रमुख सुरेश...
रिजेक्ट कोल गेट–आवंठा डॅम रस्ता खड्डेमय, ग्रामस्थ त्रस्त
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी, अन्यथा सीटीपीएस वाहतूक बंद
शिवसेना महानगरप्रमुख सुरेश पचारे यांचा प्रशासनाला इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 27 ऑगस्ट) –
        जुनी पडोली-विचोडा परिसरातील सीटीपीएसच्या रिजेक्ट कोल गेटपासून आवंठा डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे मोठे खड्डे व चिखल साचल्याने रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. या मार्गावरून दररोज १२०० हून अधिक ग्रामस्थ व शेतकरी प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीटीपीएस व पीडब्ल्यूडी प्रशासनाने या रस्त्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली असून स्थानिक नेत्यांनीही प्रशासनाला रस्ता दुरुस्तीची सूचना दिली होती. तरीसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

         या गंभीर प्रश्नावर माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगरप्रमुख सुरेश पचारे यांनी पत्रकार परिषद घेतली. “१५ दिवसांत रस्ता दुरुस्ती न झाल्यास या मार्गावरील सीटीपीएसची वाहतूक बंद केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

        या रस्त्यावरील ५२ शेतकऱ्यांची शेती प्रभावित झाली आहे. पावसाबरोबरच सीटीपीएसमधून राख वाहून नेणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. अनेक वेळा दुचाकी व चारचाकी वाहने चिखलात अडकली असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. सीटीपीएसने राख वाहून नेण्यासाठी नाली खोदून छोटा पाइप टाकला, मात्र त्यामुळे रस्ता आणखी चिखलमय झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना शेतापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. पत्रकार परिषदेत सिकंदर खान, प्रमोद कोलारकर, प्रमोद थेरे, प्रीतम पचारे, रोहन पराते, बाळू रामटेके, धनराज खरे व अरमान शेख उपस्थित होते.

#RoadCrisis #CTPS #ChandrapurNews #PublicSuffering #FarmersIssue #InfrastructureFailure #RejectCoalGate #AvanthaDam #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top