रामपूर-धोपटाळा परिसर अंधारात, २२ तास विजेचा खोळंबा
एमएसईबीचा ढिसाळ कारभार, नागरिकांमध्ये संताप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 27 ऑगस्ट) –
राजुरा शहरालगतच्या रामपूर, धोपटाळा परिसरातील विजेचा पुरवठा तब्बल २२ तासांपेक्षा अधिक काळ खंडित झाल्याने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दिनांक २७ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाला सुरुवात होताच संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालेला अंधाराचा खोळंबा २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कायम राहिला. वृत्त लिहीपर्यंत पुरवठा खंडितच होता.
श्री गणेशोत्सवात घराघरांत रोषणाई होऊन उत्सवी वातावरणाची रंगत वाढावी अशी अपेक्षा असताना, सलग विजेच्या खंडिततेमुळे भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले. नागरिकांनी एमएसईबीवर कठोर शब्दांत संताप व्यक्त करताना, “ढिसाळ कारभारामुळे आम्हाला दिवसरात्र वेठीस धरले जाते,” अशी नाराजी व्यक्त केली. मागील काही महिन्यांपासून रामपूर, धोपटाळा, सास्ती व परिसरात वारंवार विज खंडित होत असून, प्रत्येक वेळी तासन्तास पुरवठा सुरूच होत नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी एमएसईबी कार्यालयात तक्रारी नोंदवल्या, परंतु ठोस उपाययोजना झालेली नाही.
“उत्सव काळात तरी सातत्याने विज मिळावी ही अपेक्षा योग्यच आहे. मात्र प्रशासन निष्क्रिय असल्याने आम्हाला अंधारातच राहावे लागत आहे,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक नेत्यांनीही हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला असला तरी समस्या कायम आहे. यामुळे एमएसईबीच्या ढिसाळ नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
#PowerCut #RajuraNews #ElectricityCrisis #GaneshFestival #MSCBDisaster #WardhaValley #RajuraUpdate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.