आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडल्या नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या
नितीन गडकरींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जिल्हा विकासाला बळ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ ऑगस्ट २०२५) -
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची विद्यमान स्थिती, मुल बायपास रस्ता, रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB), नाले बांधकाम आणि इतर विकासकामांचे सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनातील मुख्य मुद्दे :
- चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट करणे.
- मुल शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्त्यावर रोड ओव्हर ब्रिज (ROB) बांधकाम.
- मुल-चंद्रपूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. 930) च्या दोन्ही बाजूस 8 किमी लांबीची RCC काँक्रीट नाली मंजूर करणे.
- बल्लारपूर, मुल व पोंभुर्णा येथील विविध विकासकामांना केंद्रीय मार्ग निधीमधून मंजुरी देणे.
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 वरील रेल्वे गेट (GCF 123) येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारणे.
या सर्व मागण्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले की, “ना. गडकरी यांच्या ठाम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशभरातील रस्ते विकासाला गती मिळत असून चंद्रपूर जिल्ह्यालाही त्याचा मोठा लाभ होणार आहे.”
#ChandrapurRoads #SudhirMungantiwar #NitinGadkari #HighwayDevelopment #MulBypass #ROBConstruction #NH930 #InfrastructureGrowth #BallarpurDevelopment #BetterRoadsBetterFuture #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.