चुनाळा परिसरातील अवैध वृक्षतोड व रेती तस्करी प्रकरणावर शिवसेनेचे आक्रमक पाऊल
राजुरा (दि. १४ जुलै २०२५) -
राजुरा तालुक्यातील मौजा चुनाळा येथील जंगल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास अवैध वृक्षतोड तसेच रेती तस्करी सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने लावला आहे. सदर वृक्षतोड फक्त पर्यावरणाची हानी करणारी नाही तर वनसंवर्धन धोरणाला खुली अवहेलना करणारी असल्याचे स्थानिकांचे व शिवसेनेचे म्हणणे आहे.
वनविभागातील काही जण या प्रकरणात थेट अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे आरोप सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, रेती तस्करीसुद्धा दिवसाढवळ्या सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासन व वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा नागरिक लावत आहे, अश्या प्रकारामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) राजुरा शहर शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे निवेदन देण्यात आले, निवेदनात -
- चुनाळा परिसरातील अवैध लाकूडतोड व रेती तस्करी प्रकरणी तातडीने विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात यावी.
- दोषी आढळलेल्यावर तत्काळ निलंबन व गुन्हे दाखल करावेत.
- जंगल क्षेत्रात नियमित गस्त व ड्रोन सर्वेक्षण सुरू करून कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
- नागरिकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा.
- भविष्यात बेकायदेशीर कृत्यांना आळा बसावा यासाठी सीसीटीव्ही, चौकी आणि गुप्त माहिती यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.
या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेना (उबाठा गट) राजुरा शहर शाखा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना राजुरा शहरप्रमुख बंटी उर्फ शुभम पीपरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. या वेळी शिवसेना राजुरा तालुका प्रमुख संदीप वैरागडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, युवासेना शहर चिटणीस श्रीनाथ बोल्लूरवार, बाळवंत ठाकरे, मंगल ठाकूर, रमेश झाडे, आकाश चुणारकर, जुगल भटारकर, नहिम कुरेशी, प्रेम झाडे, गोलू पिपरे, हर्षल झाडे, आदी धोटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.