रक्तदान, विद्यार्थी मदत आणि जनसंपर्क - सास्तीत सामाजिक एकात्मतेचे दर्शन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १४ जुलै २०२५) -
जनतेच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणारे, सामाजिक भान असलेले नेते स्व. निलकंठ कुडे यांच्या जयंतीनिमित्त सास्ती येथे रक्तदान शिबीर व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे व फळांचे वाटप करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमात विविध राजकीय, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, शिवसेना राजुरा तालुका प्रमुख संदीप वैरागडे, राजुरा शहर प्रमुख प्रदीप येनूरकर, राजुरा बार कौन्सिल अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, माजी सरपंच, रामपूर रमेश कुडे, माजी उपसरपंच, धोपटाळा रमेश कमटम, युवासेना कोरपना तालुका प्रमुख अंकुष्ठ वांढरे, युवासेना राजुरा शहर प्रमुख बंटी पिपरे, युवासेना राजुरा शहर चिटणीस श्रीनाथ बोल्लूरवार, स्वप्नील मोहूर्ले, आकाश चुनारकर, ग्रा.प सास्ती सदस्य मधू झाडे कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतलेल्या स्थानिक शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतली. त्यामध्ये पुढील शिवसैनिकांचा समावेश होता. शिवसेना सास्तीचे ज्येष्ठ नेते जीवन बुटले, गणपत कुडे, भास्कर चौधरी, शिव आरोग्यसेना जिल्हा समन्वयक नरसिंग मादर, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, युवासेना राजुरा तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, संयोजक शाखा सास्ती विलास भटारकर, रामेश पेटकर, मंगेश लांडे, मुरारी बुग्गारप, बालाजी रच्चावार, गणेश चन्ने, गौरव चन्ने, दिलीप बुटले, बापूजी इटनकर, वासुदेव लोहबडे, प्रमोद चौधरी, सक्षम चौधरी, प्रवीण बंडे, कमलाकर तिखट, राजू बोरकर, प्रकाश भटारकर, रवी दुवासी, सुधाकर भोयर, संतोष कुडे, निलेश चौधरी, रुपेश चौधरी, अक्षय शेरकी, रोहित पवनकर, विजय टेकाम व इतर शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय टीमने या शिबिरास भरपूर सहकार्य दिले. यावेळी डॉ. गुणिका पोटदुखे, डॉ. प्रियंका, योगिता माळी, तुषार पायघन, गायत्री पाटील, सोनी मेश्राम, मिलिंद वागदे, रुपेश घुमे, शिवाय, डॉ. गुणिका पोटदुखे, डॉ. प्रियंका व त्यांच्या टीमचा विशेष सत्कार आयोजकांकडून सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.