Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १२० लिटर डिझेलसह आरोपी अटकेत; १०,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१२० लिटर डिझेलसह आरोपी अटकेत; १०,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त राजुरा पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात अवैध डिझेल साठा जप्त आमचा ...
१२० लिटर डिझेलसह आरोपी अटकेत; १०,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त
राजुरा पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात अवैध डिझेल साठा जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १३ जुलै २०२५) -
        दिनांक १२ जुलै २०२५ रोजी राजुरा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अवैध डिझेल साठवणूक करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतील पोवनी जिल्हा परिषद शाळेजवळील एका पडिक खोलीत पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला असता, चार मोठ्या प्लास्टिक कॅनमध्ये एकूण १२० लिटर डिझेल (अंदाजे किंमत १०,८००) साठवून ठेवलेले आढळून आले. सदर प्रकरणी अमृतकुमार राजकुमार राजभर वय २८ वर्ष, रा. पोवनी याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३२३/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून १०,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, पोउपनि चाटे, परि. पोउपनि सौ. सुवर्णा काळे, पोहवा १२९४ संजय, पोअं १७८७ पोले सर्व राजुरा पोलीस स्टेशन यांनी सहभाग घेतला. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top