Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सीमा भागातील नागरिकांचे संकट कायम: १४ गावांचे सीमांकन रखडलेच!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सीमा भागातील नागरिकांचे संकट कायम: १४ गावांचे सीमांकन रखडलेच! “सुभाष धोटेंची महसूल मंत्र्यांकडे मागणी – सीमांकन तात्काळ करा!” आमचा विदर्भ - ...
सीमा भागातील नागरिकांचे संकट कायम: १४ गावांचे सीमांकन रखडलेच!
“सुभाष धोटेंची महसूल मंत्र्यांकडे मागणी – सीमांकन तात्काळ करा!”
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ जून २०२५) -
        महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन व भुमी अभिलेख तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती, ज्यामध्ये या गावांचे सीमांकन करून त्यांचे भूमी अभिलेख तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रस्ताव अवलोकनार्थ सादर करण्यात आला होता. त्यानंतर महसूल विभागाच्या अप्पर सचिवांनी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख पुणे यांना पत्र दिले.

        मात्र या निर्णयाला जवळपास ३ वर्षांचा कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. भूमी अभिलेख विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये सीमांकनाचा प्राथमिक डेटा बंदिस्त असला तरी पुढील कोणतेही नकाशे, आकारबंद, इजाफा इत्यादी तयार झालेले नाहीत. या विषयावर राजुऱ्याचे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून तात्काळ या गावांचे सीमांकन करून भुमी अभिलेख तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची मालमत्ता, जमीन हक्क, शासकीय लाभ आदींबाबत अनिश्चितता असून, प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे त्यांचा रोजचा जीवनक्रम अडचणीत आला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top