Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कृषी पंपांसाठी विशेषबाब म्हणून विद्युत जोडणी द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कृषी पंपांसाठी विशेषबाब म्हणून विद्युत जोडणी द्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि...
कृषी पंपांसाठी विशेषबाब म्हणून विद्युत जोडणी द्या
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ जून २०२५) -
        चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अडचणी लक्षात घेता, कृषी पंपांसाठी विशेषबाब म्हणून तातडीने विद्युत जोडणी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रमुख स्रोत कृषी पंप आहे. मात्र ‘बळीराजा कृषी विज माफी योजना’ लागू झाल्यापासून कृषी पंपांना नवीन विद्युत जोडण्या थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूरसारख्या पाणथळ भागात शेतीचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही आजपर्यंत विज जोडणी मिळालेली नाही.

        भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. त्यानंतर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे थेट पाठपुरावा करत शेतकऱ्यांची बाजू मांडली. चंद्रपूर जिल्ह्यात जमिनीखालील पाण्याची पातळी १५० फूटांपर्यंत असल्याने सौरपंप अनुत्पादक ठरतात. त्यामुळे पारंपरिक विद्युत पंपच गरजेचे आहेत. यामुळे विशेष बाब म्हणून कृषी पंपांसाठी विज जोडणी द्यावी, अशी स्पष्ट व ठाम मागणी त्यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top