Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "१२३ रक्तदात्यांनी दिला जीवनदानाचा संदेश!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"१२३ रक्तदात्यांनी दिला जीवनदानाचा संदेश!" "यहोवा यिरे फाउंडेशनचे रक्तदान शिबिर – युवकांचा भरघोस प्रतिसाद" आमचा विदर्भ -...
"१२३ रक्तदात्यांनी दिला जीवनदानाचा संदेश!"
"यहोवा यिरे फाउंडेशनचे रक्तदान शिबिर – युवकांचा भरघोस प्रतिसाद"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०७ जून २०२५) -
        यहोवा यिरे फाऊंडेशनच्या ७व्या वर्धापनदिनानिमित्त आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १६३ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून “चेकअप कॅप” प्राप्त केली, तर त्यातील १२३ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली.
        या उपक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या अध्यक्षा एलिजा बोरकुटे व त्यांच्या चमूने परिश्रम घेऊन संपूर्ण शिबिराचे यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या या पवित्र कार्यात चंद्रपूरकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून एक आदर्श घालून दिला. यहोवा यिरे फाऊंडेशन हे सामाजिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून, अशा सेवाभावी उपक्रमांद्वारे समाजाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top