Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ZRUCC सदस्य म्हणून अजय दुबे यांची बहुमताने निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ZRUCC सदस्य म्हणून अजय दुबे यांची बहुमताने निवड सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशीला यश आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपूर (दि. ०६ जून २०२५) ...
ZRUCC सदस्य म्हणून अजय दुबे यांची बहुमताने निवड
सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशीला यश
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ०६ जून २०२५) -
        मध्य रेल्वे मुंबईच्या स्पॉट चेक कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ZRUCC सदस्य अजय दुबे यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. अजय दुबे यांना ३६ मते मिळाली, तर इतर उमेदवारांमध्ये डॉ. आदित्य पतकतराव (पुणे) यांना ३, किशोर भोरावत (सांगली) यांना १ व अनीता जाधव (नागपूर) यांना ५ मते मिळाली.

        या विजयाबद्दल अजय दुबे यांनी सर्व ZRUCC सदस्य तसेच मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. विशेषतः, माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे त्यांनी विशेष आभार मानले. त्यांच्या शिफारशीवरूनच रेल्वेमंत्र्यांनी ZRUCC मध्ये अजय दुबे यांची निवड केली होती. याआधी अजय दुबे हे मध्य रेल्वे मुंबईतून NRUCC (रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली) साठीही निवडून गेले होते. त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि रेल्वे सेवा विकासातील योगदानाचा हा पुढचा टप्पा असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top