Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना राजुरात अभिवादन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना राजुरात अभिवादन राजुरा येथे लोकमातेच्या जयंतीला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना राजुरात अभिवादन
राजुरा येथे लोकमातेच्या जयंतीला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०३ जून २०२५) –
        शहरात लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर चौक येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव बुरांडे, , राजुरा होते. तर उद्घाटक श्री खंडोबा सेवा समिती (देवस्थान) चे अध्यक्ष पुंडलिकराव उराडे होते. मुख्य पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "अहिल्याबाई होळकर हे कुशल प्रशासक, न्यायप्रिय व प्रजावत्सल राज्यकर्ते होत्या. त्यांचे कार्य अजरामर असून, आजही त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते." या प्रसंगी कैलाश उराडे, राजकुमार चिंचोलकर, पुंडलिकराव उराडे व गोपाळराव बुरांडे यांनीही आपले विचार मांडून अहिल्याबाईंच्या कार्याचे स्मरण करून दिले.

        संचालन सुभाष चिडे यांनी केले तर सौ. सुरेखाताई उराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळू कापडे, दशरथ धवणे, मधुकर गाडगे, दिनेश पोतले, बंडूजी पोतले, सुधाकर ठमके, सचिन झाडे, वनिता उराडे, बेबीताई पोतले आदींनी मेहनत घेतली. राजुरा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, महिला भगिनींच्या उपस्थितीत आणि चहा-नाश्त्याने समारोप झालेल्या या कार्यक्रमात, धनगर समाजाची एकता व सांस्कृतिक अभिमान विशेषत्वाने जाणवला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top