Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामाजिक बांधिलकीचं दृष्टीमूल्य – मोफत शस्त्रक्रिया उपक्रमात नवे पर्व
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामाजिक बांधिलकीचं दृष्टीमूल्य – मोफत शस्त्रक्रिया उपक्रमात नवे पर्व दृष्टीदान हेच श्रेष्ठदान – सुधीर मुनगंटीवार यांच्या उपक्रमाची उजळ कामगि...
सामाजिक बांधिलकीचं दृष्टीमूल्य – मोफत शस्त्रक्रिया उपक्रमात नवे पर्व
दृष्टीदान हेच श्रेष्ठदान – सुधीर मुनगंटीवार यांच्या उपक्रमाची उजळ कामगिरी
मुनगंटीवार यांच्या हस्ते ५८ रुग्ण नागपूरला रवाना
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०३ जून २०२५) –
        बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मोफत नेत्रतपासणी शिबिरांनंतर, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या ५८ रुग्णांना नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथे रवाना करण्यात आले. यामध्ये मुल येथून ४२ रुग्ण व राजोली येथून १६ रुग्णांचा समावेश आहे. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शस्त्रक्रियेपासून ते प्रवास, निवास, भोजन आणि इतर सर्व सोयीसुविधा पूर्णतः मोफत असून, यामागे आहे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सामाजिक बांधिलकीतून घेतलेला पुढाकार. या शिबिराचे आयोजन श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरांमुळे अनेक गरजूंना दृष्टीचे नवजीवन लाभणार आहे. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यापूर्वीही विसापूर, नांदगाव, हळस्ती, बामणी, कळमना, जूनोना, चीचपेल्ली, अजयपूर, कोठारी, दुर्गापूर, इंदिरा नगर, राजोली आणि मुल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजपर्यंत आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात १५,००० हून अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया, ३५,००० हून अधिक मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यातून हजारो नागरिकांना नवदृष्टी प्राप्त झाली असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा हा एक प्रशंसनीय नमुना आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top