Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवतीतील शेतकरी फार्मर आयडी अभावी योजनांपासून वंचित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवतीतील शेतकरी फार्मर आयडी अभावी योजनांपासून वंचित शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करा - भरत बिरादार यांची प्रशासनाकडे ठाम मागणी आमचा विदर्भ...
जिवतीतील शेतकरी फार्मर आयडी अभावी योजनांपासून वंचित
शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करा - भरत बिरादार यांची प्रशासनाकडे ठाम मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. २० जून २०२५) -
        जिवती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप 'फार्मर आयडी' (शेतकरी ओळखपत्र) उपलब्ध न झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांपासून ते वंचित राहत आहेत. ऑनलाइन सातबारा नसल्यामुळे फार्मर आयडी जनरेट होत नाही आणि त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून व तांत्रिक सहाय्यापासून वंचित राहावे लागत आहे.

        शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांनी या संदर्भात प्रशासनाकडे ठोस मागणी केली असून, “जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्याप फार्मर आयडी मिळालेला नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अनेकांनी याआधी अर्ज केले असूनदेखील कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अडथळे येत आहेत,” असे त्यांनी सांगितले. 

        भरत बिरादार यांनी पुढे सांगितले की, “फार्मर आयडी तयार होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था तयार करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. ही समस्या गंभीर असून शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.”

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top