Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रीन गडचांदूरचा ''हरित संकल्प'' राबवणाऱ्याच्या पाठीशी रहा - किशोरभाऊ जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रीन गडचांदूरचा ''हरित संकल्प'' राबवणाऱ्याच्या पाठीशी रहा - किशोरभाऊ जोरगेवार निलेश ताजने यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न आम...
ग्रीन गडचांदूरचा ''हरित संकल्प'' राबवणाऱ्याच्या पाठीशी रहा - किशोरभाऊ जोरगेवार
निलेश ताजने यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. २० जून २०२५) -
        गडचांदूरच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारे ध्येयवेडे युवा नेते निलेश ताजने यांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. भाऊराव पाटील आश्रम शाळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक, धार्मिक व कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा नगर जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश देवकते, सतीश धोटे, अरुण मस्की, डॉ. अंकुश गोतावळे, आशिष देवतळे, अनय जयस्वाल, आबिद अली, बलराम डोडाणी, तुषार सोम, सुरेश केंद्रे, शिवाजी शेलोकर, रामसेवक मोरे, संदीप शेरकी, महादेव जयस्वाल, दिलीप वांढरे, संदीप गायकवाड, रवी गुरूनुळे, अ‍ॅड. अर्पित धोटे, दशरथसिंह ठाकूर, महादेव तपासे, आशिष चव्हाण, संदीप पारखी, सचिन शेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमापूजनाने झाली. हरीशचंद्र थिपे गुरुजी यांनी निलेश ताजने यांचे संघर्षमय जीवन आणि समाजसेवेतील योगदान विशद केले. आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "निलेशभाऊ हे आपल्या भागातील उदयोन्मुख नेतृत्व आहे. जनसेवेच्या कामात ते प्रामाणिक आहेत. ग्रीन गडचांदूर योजनेसारखा स्तुत्य उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे." अ‍ॅड. संजय धोटे यांनीही निलेश ताजने यांची सकारात्मक ऊर्जा आणि कणखर विचार मांडले. आपल्या भाषणात निलेश ताजने यांनी स्पष्ट केले की, "राजकारण माझा पिंड नाही, पण समाजसेवा ही माझी जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात ग्रीन गडचांदूर सारखी योजना हाती घेऊन पर्यावरणस्नेही उपक्रमांवर भर दिला जाईल."

        यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रगतीशील शेतकरी हरिभाऊ थिपे, बंडू थेरे, संजय मेंढी, शंकर उरकुंडे, सोनडवले, मंगेश लोहे, साईनाथ कुंभारे, अंकुश धाबेकर, प्रफुल मालेकर यांच्या सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गट, उत्कृष्ट शिक्षक वर्ग यांचा देखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ॲड. मंथनवार व स्नेहा काकडे यांनी केले तर आभार सपना शेलोकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीतेज फाऊंडेशन आणि निलेश ताजने मित्र परिवार यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमास जिवती, राजुरा, कोरपना तालुक्यातून सुमारे तीन हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top