Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आमचा विदर्भ - अविनाश रामटेके विरूर स्टेशन (दि. २० जून २०२५) -         राज्यात खरीप हंगा...
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. २० जून २०२५) -
        राज्यात खरीप हंगामाची सुरुवात दमदार पावसाने झाली होती. मृग नक्षत्र लागताच बळीराजाने मोठ्या आशेने कपाशी, सोयाबीन, तूर, धान आदी पिकांची पेरणी केली. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी, पेरलेले महागडे बियाणे नष्ट होण्याची वेळ आली असून, उगवलेली कोवळी पिके करपत चालली आहेत.

        विशेषतः राजुरा तालुक्यातील अनेक भागांत ही स्थिती अधिक गंभीर झाली असून, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीमुळे आणखी खर्च उचलावा लागणार आहे, तर उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी संघटनांकडून शासनाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी केली जात आहे. सिंचन योजनेला गती देणे, आर्थिक मदतीची घोषणा करणे आणि शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी अनुदान देणे यांसारख्या गोष्टी त्वरित लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top