Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील थकीत रक्कम तातडीने जमा करा – शंतनू धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील थकीत रक्कम तातडीने जमा करा – शंतनू धोटे तहसीलदारांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा आमचा विदर्भ - अनंता गोखर...
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील थकीत रक्कम तातडीने जमा करा – शंतनू धोटे
तहसीलदारांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २५ जून २०२५) –
        राजुरा तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत थकीत हप्ते अद्यापही त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. यामुळे लाभार्थ्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. या गंभीर विषयावर चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांना निवेदन सादर करून तातडीने हप्ते खात्यावर जमा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर करूनसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. जर हप्ते सात दिवसांत जमा झाले नाहीत, तर आम्ही संबंधित लाभार्थ्यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू.”

        या निवेदन देते वेळी ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमारे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अंकुश परेकर, अंकुश मस्की तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या या पावलामुळे गरजू लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top