Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा!" – डॉ. गुलवाडे यांचा विद्यार्थीप्रती शुभ संदेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा!" – डॉ. गुलवाडे यांचा विद्यार्थीप्रती शुभ संदेश "विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा अभिमान आणि शाळे...
"यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा!" – डॉ. गुलवाडे यांचा विद्यार्थीप्रती शुभ संदेश
"विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा अभिमान आणि शाळेचा वसा – चिल्ड्रन्स अकॅडमी प्रवेशोत्सव!"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २५ जून २०२५) -
        नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रारंभानिमित्त चिल्ड्रन्स अकॅडमी, चंद्रपूर या नामांकित व गुणवत्तापूर्ण शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध समाजसेवक व विचारवंत डॉ. मंगेश गुलवाडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. "यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा!" या मार्मिक शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, "अभ्यासासोबतच चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक जाणीवेची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये असावी. फक्त बुद्धिमत्ता नव्हे तर माणुसकीही जोपासा." 

        या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संचालक प्रशांत हजबन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका अक्षता मोगरे (हजबन), भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीणचे महामंत्री यश बांगडे, भारतीय जनता युवा मोर्चा महानगरचे महामंत्री गणेश रामगुंडेवार, सामाजिक कार्यकर्ते पराग मलोडे यांची उपस्थिती होती. 

        या कार्यक्रमात शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिल्ड्रन्स अकॅडमी ही शाळा केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. शाळेने आजवर अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नवचैतन्य, नवे संकल्प आणि यशाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली. या निमित्ताने एक नवीन प्रेरणादायी वाटचाल सुरू झाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top