Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आणीबाणी काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आणीबाणी काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर म...
आणीबाणी काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न
आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरतर्फे आयोजन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २६ जून २०२५) -
        १९७५ मध्ये घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २५ जून रोजी 'आणीबाणी काळा दिवस' म्हणून पाळण्यात आला. या निमित्ताने भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगर वतीने आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

        या सन्मान सोहळ्याला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, अरुण तिखे, दिवाकर पूट्टडवार, अजय जयस्वाल, प्रविण गिलबीले, माजी नगरसेविका छबू वैरागडे, पुष्पा उराडे, शितल आश्राम, श्याम कनकम, नामदेव डाहूले, जितेश कुळमेथे, आशिष मासिरकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, मुग्दा खाडे, आशा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात आणीबाणी काळात सत्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी गिरीश अणे, हेमंत डाहाक, सुधीर टिकेकर, नारायण पिंपळापुरे, अनिल अंदनकर, कृष्णा देशपांडे, शिल्पा देशकर या लढा देणाऱ्या पुढील संघर्षशील नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान समारंभादरम्यान लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणाऱ्या या योद्ध्यांच्या त्यागाचे स्मरण करून, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर नव्या पिढीपुढे स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेला लढा, त्यातून मिळालेली शिकवण अधोरेखित करण्यात आली.

        "आणीबाणी हा काळ देशाच्या इतिहासातील अंधारलेला अध्याय होता. अनेकांनी त्या काळात सत्य आणि संविधानासाठी संघर्ष केला. अशा लोकांमुळे भारताची लोकशाही टिकून राहिली. त्यांच्या योगदानाचे स्मरण हे नव्या पिढीला जागवणारे आहे." असे विचार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केले. 

        "आपण आज स्वातंत्र्याने वावरतो, बोलतो, मतदान करतो – यामागे अनेक योद्ध्यांचा संघर्ष आहे. त्यांनी तुरुंगवास पत्करला, पण संविधान व लोकशाही तत्त्वांशी तडजोड केली नाही. अशा लोकांचा सन्मान करून आपण लोकशाही मूल्यांना अभिवादन करत आहोत." असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली, ज्यामध्ये युवक, महिला कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संयोजन अतिशय प्रेरणादायी आणि लोकशाही मूल्यांना समर्पित असे ठरले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top