Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ट्रॅक्टर दोन हजार वसुलीचा आरोप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ट्रॅक्टर दोन हजार वसुलीचा आरोप file image आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०५ जुन २०२५) - ...
रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ट्रॅक्टर दोन हजार वसुलीचा आरोप
file image
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ जुन २०२५) -
        राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजूंसाठी निशुल्क रेती वितरणाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना अधिकृतपणे ठरवून दिलेल्या रेती घाटावरून मोफत रेती देण्यात येणार आहे. 

        मात्र राजुरा तालुक्यातील नलफडी रेती घाटात या योजनेच्या अंमलबजावणीतच गैरप्रकार घडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. एका लाभार्थ्यांने "आमचा विदर्भ" शी बोलताना सांगितले की, शासकीय कर्मचारी काही मध्यस्थी यांच्या संगनमताने घरकुल रेतीसाठी त्यांच्याकडून प्रत्येकी ट्रॅक्टर दोन हजार रुपये घेत आहेत. ही बाब गंभीर असून राज्य शासनाच्या योजनेंतर्गत गैरव्यवहार होतोय हेच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे. लाभार्थ्यांनी याविरोधात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. "मोफत रेती ही आमची हक्काची, त्यासाठी पैसे मागणे चुकीचे आहे," असे म्हणत त्यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकारामुळे शासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी स्थानिक पातळीवर कशी बिघडवली जाते, याचे हे आणखी एक उदाहरण ठरते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top