Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुहूर्तावर विवाह लावून आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबाचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुहूर्तावर विवाह लावून आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबाचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. ...
मुहूर्तावर विवाह लावून आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबाचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०४ जून २०२५) -
        आजकाल लग्न समारंभात डीजे, फोटोशूट, आणि वेळेचा अपव्यय जास्तच पाहायला मिळतो. पण गडचांदूर येथील एका विवाहाने वेगळाच आदर्श निर्माण केला. लखमापूर येथील विठ्ठलराव खुटमाटे यांची कन्या हिमाणी आणि वणी (जि. यवतमाळ) येथील पांडुरंग मोहितकर यांचे सुपुत्र निलेश यांच्या विवाह सोहळ्यात सकाळी ११:३० वाजता असलेल्या मुहूर्तावर अगदी अचूकपणे विवाह विधी पार पाडले गेले. विवाहाच्या वेळेचे भान राखून ठरलेल्या मुहूर्तावर विवाह लावल्याबद्दल राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुदर्शन निमकर आणि त्यांच्या पत्नी सौ. वर्षा निमकर यांनी दोन्ही कुटुंबाचा आणि नवविवाहित जोडप्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक हरीचंद्र थीपे गुरुजी, गडचांदूरचे व्यापारी अरुण गोरे, भोयेगावचे किसनराव डोंगे, तसेच वधू-वरांचे पालक आणि वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विवाह सोहळा गडचांदूर परिसरातील एक आदर्श आणि वेळेचे भान ठेवणारा कार्यक्रम ठरला आहे. उपस्थित वऱ्हाड्यांनी वेळेवर विवाह लागल्यामुळे समाधान व्यक्त करत, अशा विवाहांना समाजाने प्रोत्साहन द्यावे अशी भावना व्यक्त केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top