Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अ‍ॅटोमधून सुगंधित तंबाखूची वाहतूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ऑटोमधून सुगंधित तंबाखूची वाहतूक जवळपास ६ लाखाचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०५ जुन २०२५) -       ...
ऑटोमधून सुगंधित तंबाखूची वाहतूक
जवळपास ६ लाखाचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०५ जुन २०२५) -
        राजुरा पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याची सुमारे ५ लाख ९९ हजार रुपयांची बेकायदेशीर वाहतूक पकडली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वाखाली झाली. मुखबीराच्या माहितीवरून अविनाश शेंडे वय ४२ वर्षे रा. चंद्रपूर या आरोपीच्या ताब्यातील अ‍ॅटो क्रमांक MH 34 D 6339 ची तपासणी केली असता, ऑटोच्या मागील सीटवर ठेवलेली पाच पांढऱ्या प्लास्टिक चुंगड्यांमध्ये बेकायदेशीर ईगल हुक्का तंबाखू अंदाजे किंमत 54 हजार 780, होल्ला हुक्का शिशा तंबाखू 150 पाउच किंमत 39 हजार 750, विमल पान मसाला 4 हजार 356, वि-1 तंबाखू 440 रुपये, वाहनाची अंदाजित किंमत 5 लाख असा एकूण 5 लाख 99 हजार 326 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात भा.दं.वि. कलम 123, 275, 223 सह अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 च्या कलम 26(2)(a), 26(2)(i), 26(2)(iv), 59 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, व उपविभागीय अधिकारी यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे पोउपनि भिष्मराज सोरते, पोउपनि पांडुरंग हाके, व पोलीस अंमलदार विक्की निर्वाण, प्रभाकर कोराम, शफीक शेख, शरद राठोड यांचा या कामगिरीत मोलाचा वाटा राहिला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top