Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुल SDO सभागृहासाठी 1.30 कोटींचा निधी मंजूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुल SDO सभागृहासाठी 1.30 कोटींचा निधी मंजूर आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. 06 जून 2025) -   ...
मुल SDO सभागृहासाठी 1.30 कोटींचा निधी मंजूर
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. 06 जून 2025) -
        राज्याचे माजी मंत्री आणि स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुल येथील SDO कार्यालयाच्या सभागृहाचे नूतनीकरण आता प्रत्यक्षात येणार आहे. या कामासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच काम सुरु होणार आहे. मुल येथील नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत सभागृहाच्या जीर्ण अवस्थेकडे लक्ष वेधून आ. मुनगंटीवार यांनी तातडीने नूतनीकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून निधीची मागणी करण्यात आली. आमदार मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या नूतनीकरणामुळे प्रशासनाच्या बैठकांपासून ते विविध कार्यक्रमांपर्यंत अनेक उपक्रम सुसंगत आणि कार्यक्षमतेने राबविता येणार आहेत. याचा थेट फायदा नागरिकांना होणार असून प्रशासकीय कामकाजाची गुणवत्ता व सुविधा यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

विकासाच्या मार्गावर मुल तालुका
        मुल तालुक्यातील विकासाची ही केवळ एक कडी असून याआधी देखील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साकारले गेले आहेत. यात मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील व पंचायत समितीच्या इमारती, नवीन पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, इको पार्क, स्विमिंग टँक, आठवडी बाजार, आणि वाचनालय यांचा समावेश आहे. याशिवाय, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय आणि मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top