Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा शहरातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी २९ सामाजिक संघटना एकत्रित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा शहरातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी २९ सामाजिक संघटना एकत्रित प्रशासनाला दिले निवेदन, तात्काळ उपाययोजनांची मागणी आमचा विदर्भ - दीपक श...
राजुरा शहरातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी २९ सामाजिक संघटना एकत्रित
प्रशासनाला दिले निवेदन, तात्काळ उपाययोजनांची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ११ जून २०२५) -
        राजुरा शहर व परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. अपुरी पायाभूत सुविधा, वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, पथदिव्यांचा अभाव व महामार्गाचे नियोजनशून्य काम यामुळे नागरिकांचे जनजीवन त्रस्त झाले आहे.

        या पार्श्वभूमीवर राजुरा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत एकत्र येत एक संयुक्त निवेदन प्रशासनाला सादर केले. एकूण २९ सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होत्या. या निवेदनात 
  • महामार्गाचे नियोजनशून्य काम – वर्धा नदीकाठच्या परिसरात ढिगाऱ्यामुळे पावसात चिखल व धुळीमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. 
  • नगरपरिषदेची करवाढीमुळे  सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
  • गुन्हेगारी व चोरीचे प्रमाण वाढले
  • पार्किंगची समस्या – गट्टू लावण्याचे निकृष्ट दर्जाचे काम व अपुरी पार्किंग
  • जड वाहनांची अनियंत्रित वाहतूक
  • वाहतूक सिग्नल बंद – विशेषतः पंचायत समिती चौकात
  • मुख्य रस्त्यावर पथदिव्यांची कमतरता
        हे निवेदन खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, पोलीस निरीक्षक, व नगर परिषद मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले. रविंद्र माने, उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी सांगितले की, लवकरच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन समस्यांवर त्वरित उपाययोजना केली जाईल

        यावेळी, रोटरी क्लब, जेसीआय राजुरा, व्यापारी असोसिएशन, रामबाग विकास समिती, धनोजे कुणबी समाज, राजपूत क्षेत्रीय समाज, तैलिक समाज संघटना, सुतार समाज संघटना, आर्य वैश्य कोमटी समाज मंडळ, राजस्थानी समाज मंडळ, पत्रकार संघ, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, जामा मस्जिद वक्त कमिटी, ब्राह्मण समाज मंडळ, खैरे कुणबी समाज मंडळ, बार असोसिएशन, नाभिक समाज मंडळ, मॉर्निंग वॉक ग्रुप, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य, भारतीय बौद्ध महासभा, गुरुदेव सेवा मंडळ, मेडिकल असोसिएशन राजुरा, ख्वाजा सिया मुस्लिम समाज बांधव, फ्रेंड्स स्पोर्ट क्लब, माजी विद्यार्थी संघ, तेली समाज युवक मंडळ, जीवनदीप पर्यावरण संस्था, बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना आदी सामाजिक संघटनांचा समावेश होता. सामाजिक संघटनेची एकजुटता व सामूहिक आवाज प्रशासनाला निश्चितच उपाययोजना करण्यास भाग पाडेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top