Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: “चोरी कितीही हुशारीने केली तरी पोलिसांच्या सापळ्यात अडकतोच!”
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
“चोरी कितीही हुशारीने केली तरी पोलिसांच्या सापळ्यात अडकतोच!” “मोटरसायकल चोरीचा मास्टरमाइंड अखेर अडला पोलिसांच्या जाळ्यात” आमचा विदर्भ - दीपक...
“चोरी कितीही हुशारीने केली तरी पोलिसांच्या सापळ्यात अडकतोच!”
“मोटरसायकल चोरीचा मास्टरमाइंड अखेर अडला पोलिसांच्या जाळ्यात”
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 07 जून 2025) -
        जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहन चोरी उघडकीस आणण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

        या पथकाने पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल गुन्हेगार जनरल सिंग उर्फ मनोज सिंग टाक वय 45, रा. उर्जानगर चंद्रपूर याला दुर्गापूर रोड येथून चोरीच्या मोटरसायकलसह अटक केली. सदर आरोपी एसटी वर्कशॉपजवळ विना क्रमांकाची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल घेऊन खरेदीदार शोधत होता, तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने नायडू हॉस्पिटल परिसरातून एक महिना पूर्वी चोरी केलेली स्प्लेंडर मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून स्प्लेंडर प्रो मोटरसायकल क्रमांक MH-34 AX-3848 अंदाजे 50 हजार किंमतीची गाडी जप्त करण्यात आली. तसेच अधिक चौकशीत त्याने गडचिरोली येथे एका महिलेकडून सोन्याची चैन हिसकावून जबरी चोरी केल्याचे उघड झाले. सदर प्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये आधीच गुन्हा नोंद आहे. यामुळे सदर आरोपीची माहिती आणि अटक गडचिरोली गुन्हे शाखेला देण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गौहकार, नितीन साळवे, नितीन कुरेकर, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, प्रशांत धुळगंडे आदींचा सक्रिय सहभाग होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top