Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजूरा, कोरपना, जीवती, गोंडपिपरीतील आदिवासी समाजाला पहिला वकील मिळाला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजूरा, कोरपना, जीवती, गोंडपिपरीतील आदिवासी समाजाला पहिला वकील मिळाला 58 वर्षांनंतर नवा प्रवास - डॉ. मधुकर कोटनाके यांची वकिली क्षेत्रात दमद...
राजूरा, कोरपना, जीवती, गोंडपिपरीतील आदिवासी समाजाला पहिला वकील मिळाला
58 वर्षांनंतर नवा प्रवास - डॉ. मधुकर कोटनाके यांची वकिली क्षेत्रात दमदार एन्ट्री
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 17 मे 2025) -
        मुंबई येथील महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद (Bar Council of Maharashtra and Goa) B.A., M.A. व LLB या शैक्षणिक पात्रता दस्तऐवजांची तपासणी करून डॉ. मधुकर कोटनाके यांना अधिवक्ता (Advocate) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, वयाची ५८ वर्षे पूर्ण करून सामाजिक भान ठेवून सेवानिवृत्तीनंतर डॉ. मधुकर कोटनाके यांनी वकील म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे. राजूरा, कोरपना, जीवती आणि गोंडपिपरी या आदिवासीबहुल परिसरातील पहिला आदिवासी वकील म्हणून ते ओळखले जातील.

सामाजिक कार्यातून न्यायाच्या सेवेकडे
        सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा हेच ध्येय ठेवून डॉ. कोटनाके यांनी वकिलीचा अभ्यास पूर्ण केला. स्थानिक आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढणारा आवाज बनण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाने परिसरातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समाजातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या मेहनतीला न्याय मिळाल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top