Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "दहशतवादाविरोधातील लढ्यात भारतीय सेनेला सलाम''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"दहशतवादाविरोधातील लढ्यात भारतीय सेनेला सलाम'' ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राजुरात देशभक्तीचा जल्लोष आमचा विदर्भ - दीपक शर्मा राज...
"दहशतवादाविरोधातील लढ्यात भारतीय सेनेला सलाम''
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राजुरात देशभक्तीचा जल्लोष
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 17 मे 2025) -
        ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ शुक्रवारी शहरातून भव्य तिरंगा यात्रा काढली गेली. या दुचाकी यात्रेला राजुरा वासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला. भारत माता की जय आणि हम सेना के साथ है अशा जयघोषाने राजुरा शहर परिसर निनादून गेला.

ऑपरेशन सिंदूर - दहशतवादावर निर्णायक प्रहार
        पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आले आहे. या शौर्यगाथेचा सन्मान म्हणून राजुरा शहर व परिसरातील नागरिकांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले. यात्रेच्या प्रारंभी माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार देवराव भोंगळे, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, मुख्याधिकारी येमाजी धुमाळ, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सैनिक गुरुदास कोपुलवार, सुरेश गीरटकर, शंकर मेंगरे, गणेश दुबे, सुरेश तोडसाम, तुकाराम मडावी, निशा मोहुर्ले आणि भोयर यांचा सहभाग होता.

        भारत लॉज चौकातून सुरू झालेली यात्रा रामपुर आणि चुनाळा येथून फिरून भारत लॉज चौकात समाप्त झाली. या यात्रेत विविध सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top