Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "ठेका कामगारांचा आवाज - हक्कांसाठी एकत्र लढा!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"ठेका कामगारांचा आवाज - हक्कांसाठी एकत्र लढा!" कोल इंडिया कामगार आक्रमक मागण्यांसाठी गौरी-पौनी उपक्षेत्रात तीव्र आंदोलन! आमचा विदर...
"ठेका कामगारांचा आवाज - हक्कांसाठी एकत्र लढा!"
कोल इंडिया कामगार आक्रमक
मागण्यांसाठी गौरी-पौनी उपक्षेत्रात तीव्र आंदोलन!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ मे २०२५) -
        वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी - पोवनी उपक्षेत्रीय कार्यालयासमोर ठेका व स्थायी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार धरना आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येत जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती माजी महामंत्री ABKMS / कोल इंडिया मानकीकरण समिती सदस्य सुधीर घुरडे, माजी ठेका कामगार प्रभारी ABKMS / कोल इंडिया माजी HPC सदस्य दिलीप सातपुते यांनी उपस्थित कामगारांना त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन करत संघर्षाची दिशा दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोगेन्दर यादव होते, तर संचालन BKKMS वर्धा वेली महामंत्री अनिल निब्रड यांनी केले. आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले, जसे की रोजगाराची सुरक्षा, मानधनाची अचूकता, आरोग्य सुविधा, कामाच्या अटींचे शुद्धीकरण आणि इतर अनेक अत्यावश्यक सुविधा.

मुख्य मागण्या 
  • ठेकेदार बदलल्यानंतरही कामगारांना प्राधान्य
  • ८ तासांची निश्चित कामाची वेळ
  • योग्य पगार पावत्या, ओटी, सुट्ट्या व इतर हक्क
  • आरोग्य सुविधा, आरओ पाणी, शुद्ध जेवण व निवास सुविधा
  • धूळ नियंत्रण, वाहतूक रस्ते दुरुस्ती, कॅम्प ते स्थानक वाहनसेवा
  • महिला कामगारांसाठी आवश्यक सुविधा व सेफ्टी
  • कॉलनीत स्वच्छता, रस्ते, पाणी, आरोग्य सेवा व इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top