रावेरीत सीतानवमी निमित्त धैर्यशील मातांचा गौरव
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर – (दि. ०३ मे २०२५) -
भारतीय संस्कृतीत सतीत्व, धैर्य व संयमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सीता मातेच्या जन्मोत्सवा निमित्ताने, ५ मे २०२५ रोजी रावेरी येथे भव्य 'स्वयंसिद्धा सीता पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांनी स्वखर्चाने जीर्णोद्धार केलेल्या सीता मंदिर प्रांगणात पार पडणार आहे. या विशेष प्रसंगी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतरही खचून न जाता आपल्या मुलांना लवकुशासारखे घडवणाऱ्या, स्वतः आत्मनिर्भर ठरलेल्या आणि समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या धैर्यशील मातांचा गौरव केला जाणार आहे.
या वर्षी पुरस्कारासाठी निवड झालेल्या मातांमध्ये –
- रोहिणी सावजी (नागपूर)
- अंजना काळे (कोरपना)
- पूर्वा देशपांडे (राजुरा)
- उज्वला मोंढे (नागपूर)
- वंदना कुबडे (वर्धा)
- संगीता मोहितकर (वरोरा)
- प्रणाली बावणे (नागपूर) यांचा समावेश आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप भूषविणार असून उद्घघाटन माजी आमदार सरोज काशीकर करणार आहेत. प्रमुख अतिथी शेतकरी महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष प्रज्ञा बापट (यवतमाळ), माजी प्रांताध्यक्ष शैला देशपांडे (आर्वी), सीमा नरोडे (पुणे), माया पुसदेकर (अमरावती), प्रज्ञा चौधरी (यवतमाळ), ज्योत्स्ना बहाळे (अकोला), सुहासिनी वानखेडे (अकोला), रंजना मामर्डे (अमरावती), वर्षा तेलंगे संचालिका,जि.म.सह.बँक (यवतमाळ), सोनाली मरगडे, जिल्हाप्रमुख, शेतकरी महिला आघाडी, (यवतमाळ), वर्षा बोरेकर, संचालिका, तालुका खरेदी विक्री संस्था, स्वभाप अध्यक्ष अनिल घनवट, दिनेश शर्मा, गुणवंत हंगरगेकर, मधुसूदन हरणे, सतीश दाणी, नारायण काकडे, विनोद काकडे, रावेरी सरपंच राजेंद्र तेलंगे, संदीप तेलंगे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, राजेंद्र झोटींग इत्यादी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सीता नवमी महिला उत्सव समिती, शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी, स्वतंत्र भारत पार्टी, हनुमान देवस्थान ट्रस्ट, रावेरी, महिला बचत गट, रावेरी ग्रामपंचायत व महिला भजनी मंडळ यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.