"शेतकरी कर्जमाफी आणि ओबीसी जनगणनेसाठी अखिल कुणबी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती (दि. २३ एप्रिल २०२५) -
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल कुणबी महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शेतकरी, ओबीसी व सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित अनेक गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत. ओबीसींना शिक्षण, नोकरी, राजकारण व सामाजिक क्षेत्रात प्रतिनिधित्व, शासकीय शाळांचे संरक्षण, रोजगार निर्मिती आणि कुणबी महामंडळाच्या स्थापनेसारख्या विविध मागण्या मांडल्या गेल्या.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ राबवावी, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, कुणबी महामंडळाची स्थापना करून समाजाच्या विकासाला चालना द्यावी, शासकीय प्राथमिक शाळा बंद करू नयेत, त्या पूर्ववत सुरु ठेवाव्यात, नॉन-क्रीमीलेयरची अट रद्द करावी, सर्व क्षेत्रांत रोजगारनिर्मितीचे धोरण राबवावे, शिक्षण, नोकरी, राजकारणात आरक्षणाच्या प्रतवारीनुसार योग्य प्रतिनिधित्व द्यावे. अश्या मागण्यांच्या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अखिल कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरीकर, जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, उपजिल्हाध्यक्ष अतुल कोल्हे, कार्याध्यक्ष सुधीर कोरडे, देवेंद्र बट्टे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. विद्या चिताडे, जिल्हा सचिव सौ. वर्षा कालभूत, उपाध्यक्ष संजय फाले, युवा महाराष्ट्र अध्यक्ष आशिष येडांगे, जिल्हा संपर्कप्रमुख नूतन लेडांगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.