Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचे कडक कारवाईचे सत्र सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
illegal sand transport, sand smuggler अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचे कडक कारवाईचे सत्र सुरु विरूर परिसरात छुप्या पद्धतीने रेतीची अवैध वाहतूक ...
illegal sand transport, sand smuggler
अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचे कडक कारवाईचे सत्र सुरु
विरूर परिसरात छुप्या पद्धतीने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचा आवळल्या मुसक्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १४ फेब्रुवारी २०२५) -
        स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विरूर पोलीस स्टेशन परिसरात छुप्या पद्धतीने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक आणि त्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. २२ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

        या कारवाईत पोलिसांनी आरोपित १) प्रफुल्ल श्यामराव गेडेकर (३३ वर्षे) - व्यवसाय : ट्रक चालक, रहिवासी : नगराळा, तहसील जिवती, जिल्हा चंद्रपूर. २) आनंद माधवराव ढगे (४० वर्षे) - व्यवसाय : ट्रक मालक, रहिवासी : कोरपना, जिल्हा चंद्रपूर.  या दोन्ही आरोपींविरुद्ध विरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५/२५, भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) आणि मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी ट्रक चालकाला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

        या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, तसेच पोलीस शिपाई जयंता चुनारकर, संतोष येलपुलवार, गोपाल अटकुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे, गणेश भोयर (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या या कडक कारवाईने अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #illegalsandtransport #sandsmuggler #wirurstation #localcrimebranchchandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top