Merchant Premier League Cricket Tournament
व्यापारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न
मेश्राम प्लायवूड संघ विजयी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 07 फेब्रुवारी 2025) -
राजुरा व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी प्रीमियर लीग 30 यार्ड नाईट क्रिकेट स्पर्धा (Merchant Premier League Cricket Tournament) 22 ते 26जानेवारी दरम्यान कन्यका मंदीर (mata kanyaka mandir rajura) परिसारातील पटांगणात आयोजित करण्यात आली होती, स्पर्धा व्यापाऱ्यांच्या एकत्रितपणाचे प्रतीक ठरली. (vyapari assosiation rajura)
या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला, त्यात ''अ'' गटात मेश्राम प्लायवूड, परिवार फॅशन शिव ऑप्टिकल्स, दत्ता प्लायवूड, राज आइस्क्रीम व स्नेहदीप गारमेंट तर ''ब'' गटात झाडे इलेक्ट्रिकल्स, विकास ज्वेलर्स, निर्भय ट्रेडर्स, नक्षत्र हॉल, साँवण एजन्सी व बजाज सारडा स्काॅड या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विविध गटांचे उत्कृष्ट सामने रंगले. मेश्राम प्लायवूड आणि स्नेहदीप गारमेंट अंतिम सामन्यात समोरा समोर आले. मेश्राम प्लायवूड ने स्पर्धेत विजयी होऊन चषक आपल्या नावावर केला, तर स्नेहदीप गारमेंट संघ उपविजेता ठरला. महिलांचे चार संघ देखील यामध्ये सहभागी झाले होते, ज्यात जय भवानी महिला संघाने विजेतेपद मिळवले.
स्पर्धेत बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून अनिल चव्हाण यांची निवड झाली. उद्घाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये आमदार देवराव भोंगळे (deorao nhongale), तहसीलदार ओमप्रकाश गोंड, माजी आमदार सुदर्शन निमकर (sudarshan nimkar), माजी आमदार सुभाष धोटे (subhash dhote), माजी नगराध्यक्ष अरुण धोटे (arun dhote), भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे (satish dhote), माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, पंढरीनाथ बोन्डे (pandharinath bonde), चंद्रपुर केमिस्ट एसोसिएशन अध्यक्ष बंटी घाटे, सचिव जीतू राजा, गडचांदूर एसोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी, रवि गेलड़ा, सचिन नीले, आर्य वैश्य समाजामंदिर समितीचे पदाधिकारी व सदस्यगण, जेसीआय, रोटरी क्लब तसेच मोठ्या संख्येत व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. मान्यवरांनी प्रत्येक दिवशी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेच्या यशामध्ये योगदान दिले. यासोबतच, व्यापार संघटनांच्या समर्थनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली. नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे एकत्रित सहकार्य महत्वाचे ठरले, ज्यामुळे हा कार्यक्रम अजून समृद्ध होऊ शकला.
स्पर्धेचे बक्षिस वितरण माजी आमदार अँड वामनराव चटप (adv wamanrao chatap) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री, भद्रावती अध्यक्ष प्रकाश पामपटिवार, सचिव अखिल, माजी नगराध्यक्ष रमेश नळे (ramesh nale), माजी नगरसेवक सेठ राधेशाम अडानिया (seth radheshyam adaniya), प्राचार्य संभाजी वारकड, डॉ. अशोक जाधव, ओम प्रकाश गुप्ता, राजू खोबरागड़े, राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन (sandip jain), हरभजन सिंग भट्टी (harbhajan singh bhatti), संतोष रामगिरीवार, आनंद चांडक, झहीर लखानी, रजब अली बंदाली, समीर बाबवानी, विनोद झंवर, गजानन कुळकर्णी, अमजद खान सह सर्व व्यापारी सदस्यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशस्वितेकरिता प्रणय वीरमालवार, रवींद्र बानकर, जीवन आक्केवार, सारंग रामगीरवार, बाबू जैन, राजेश बजाज, किशोर गुरू, घनशाम हेपट, सोहेल बंदाली, साईंवर बंधू, पवन गंभीर व सर्व व्यापाऱ्यांनी परिश्रम घेतले.
#MerchantPremierLeagueCricketTournament #matakanyakamandirrajura #Crickettournament #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.